रांजणगाव एमआयडीसीतील कंपनी भक्ष्यस्थानी (Video)

Image may contain: cloud, sky, mountain and outdoor
रांजणगाव गणपती, ता. 2 जून 2018: रांजणगाव एमआयडीसीतील 'के फ्लेक्‍स' या कंपनीला शुक्रवारी (ता. 1) सायंकाळी अचानक आग लागून संपूर्ण कंपनीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रांजणगाव एमआयडीसीत गेल्या आठ-दहा वर्षांपासून या कंपनी वातानुकूलन यंत्रणेसाठी (एसी) व वाहनांची आसने, गाद्या व इतर कामासाठी लागणारे फोम तयार केले जातात. शिवाय, तयार मालाचा साठाही कंपनीतच ठेवला जातो. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. फोमच्या साठ्याने क्षणार्धात पेट घेतल्याने कंपनीच्या इतर विभागांतही झपाट्याने आग पसरली. या वेळी कंपनीत सुमारे चारशे कामगार काम करीत होते. आगीचा धोका ओळखून या सर्व कामगारांना "इमर्जन्सी एक्‍झिट'मधून बाहेर काढण्यात आले. कंपनीमध्ये एवढी मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने सुमारे दीड तास भडकत होती. धुराचे मोठे लोट दुरवरून दिसत होते.

एमआयडीसीतील अग्निशामक पथकाने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु वाऱ्यामुळे आग पुन्हा भडकत होती. एमआयडीसीतील फियाट, एलजी या कंपन्यांच्या अग्निशामक दलानेही आग आटोक्‍यात आणण्यात मोठी मोलाची मदत केली. स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्‍यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. रात्री उशिरापर्यंत आग सुरूच होती.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, शशिकांत भोसले यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन खबरदारीच्या उपाययोजना केल्या. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. कंपनीतील एकही विभाग आगीपासून वाचू शकला नाही. या आगीबाबत उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद झाली नव्हती.

Image may contain: cloud, sky, outdoor and nature

Image may contain: cloud, sky, outdoor and food

Image may contain: cloud, sky, outdoor and food

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या