अजित पवार म्हणालेले 'ते' गद्दार नेमके कोण?

Image may contain: 1 personन्हावरा, ता. 3 जून 2018: 'मी तालुक्‍यात आलो की व्यासपीठावर यायचं, पदासाठी मागेपुढे पळायचं, हट्ट धरायचा, अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं म्हणायचं. स्वतःला पदे पदरात पाडून घ्यायची आणि मी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम करून त्याला निवडणुकीत पाडायचं, ही कुठली पद्धत? अशा कार्यकर्त्यांनी जरा जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. या पुढे असले कार्यकर्ते नसलेले परवडले. या पुढे माझ्या लक्षात आल्यानंतर अशा गद्दार कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून हाकलून देणार आहे,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

न्हावरे (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार बोलत होते. यावळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. अजित पवार यांनी गद्दारांना हाकलून देईल, असे म्हटल्यानंतर गद्दार नेमके कोण? आगामी निवडणूकीत या गद्दारांना पक्ष जवळ करणार की खरोखरच हाकलून देणार, यावर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

फसव्या सत्ताधाऱ्यांना हद्दपार करा...
देशातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांना सामान्य माणसांचे काही देणेघेणे नाही. मागील चार वर्षांत फक्त सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता, हे तंत्र अवलंबल्यामुळे विकासकामे बाजूला राहिली. त्यातून शेतकरी व सामान्य माणसांबरोबर कोणताही घटक समाधानी नाही. त्यामुळे अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणाऱ्या अशा फसव्या सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत हद्दपार करा.

प्रशासनावर वचक नाही...
सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. त्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे विकासकामे खुंटली आहेत. ऊस, कांदा, दूध आणि इतर मालालाही बाजारभाव नसल्यामुळे हे सरकार आपल्या मुळावर उठले आहे की काय, अशी भावना आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कर्जमाफीबाबतही सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत करत आहे.'


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या