पाचर्णे म्हणतात कार्यकर्त्यांनो रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्या

Image may contain: 5 people, people standing and outdoor
तळेगाव ढमढेरे , ता. 4 जून 2018 (एन. बी. मुल्ला): येथील वेळ नदीच्या पुलापासून मुख्य रस्त्याचे एल अँड टी फाट्यापर्यंत डांबरीकरण करून नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी आमदार बाबूराव पाचर्णे करताना कार्यकर्त व ग्रामस्थांना या कामाकडे लक्ष देण्यास सांगितले.

शिरूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. www.shirurtaluka.comने रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.  रस्त्यांच्या दुरावस्थेवरून नेटिझन्सनी पाचर्णे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. पावसाळा सुरू झाला असून, अद्यापही रस्त्यांची कामे सुरू आहेत. आता रस्ते दुरुस्त करून ही कामे किती दिवस टिकतील हा प्रश्नच आहे.

अनेक दिवसापासून येथील नागरिकांच्या रस्ता दुरुस्तीच्या सततच्या मागण्यांचा विचार करून आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वेळनदीच्या पुलापासून तळेगाव-एल अँड टी फाट्यापर्यंत राष्ट्रीय बांधकाम विभागाअंतर्गत निधीतून रस्ता तयार करण्यात येणार आहे. रस्त्यावर पाणी साचून रस्ता खराब होत असल्याने रस्त्याच्या बाजूने चारी खणून रस्त्यावरील पाणी चारीने बाहेर काढण्यात येणार असल्याने रस्त्याचे काम सुरू असतानाच चारी देखील खोदण्यात आल्या आहेत. रस्त्याची पाहणी करण्यासाठी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समवेत कार्यकर्ते उपस्थित होते.

रस्त्याच्या बाजूने खणलेल्या चाऱ्यांमध्ये बऱ्याचवेळा दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्यापूर्वी लवकरात लवकर रस्त्याचे व सुरक्षित अशा चाऱ्यांचे काम होणे आवश्यक आहे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे काम सुरू झाल्याने पहिल्या पावसातच रस्त्याच्या कामाची गुणवत्ता सिद्ध होईल? अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या