तळेगाव ढमढेरे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

Image may contain: 19 people, people smiling, people standing
शिरूर तालुका आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे यांचा उपक्रम

तळेगाव ढमढेरे, ता. 6 जून 2018 (एन.बी. मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथील जामा मस्जिदमध्ये शिरूर तालुका आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी सालाबादप्रमाणे इफ्तार पार्टीचे आयोजन केले. नवनाथ कांबळे हे गेली २३ वर्षे मुस्लीम बांधवाबरोबर ३० दिवस उपवास करून हिंदू-मुस्लीम ऐक्य जोपासत आहेत.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आयोजित इफ्तार पार्टीत दोन जेष्ठ नागरिकांचा सन्मान व सात रोजाधारकांना संपूर्ण पोशाख देऊन तसेच लहान मुलांचा सन्मान करून फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलिस उपनिरीक्षक गणेश वारुळे, प्रशांत माने, प्रकाश चव्हाण, ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, नंदकुमार नागरगोजे, तळेगाव ढमढेरे जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष मुनीर मोमीन, युसुफ बागवान, तळेगावचे माजी उपसरपंच बाळासाहेब ढमढेरे, मनोज अल्हाट, प्रशांत गायकवाड, अशोक शेलार, सागर कांबळे, गनिभाई मोमीन, जावेद बागवान, अजित शेख, राजू मोमीन, दिलीप बागवान, आरिफ आतार, कादिर शेख, नबीभाई इनामदार, बाबुभाई काझी आदी  उपस्थित होते.

हिंदू-मुस्लीम बांधवाना एकत्रित ठेवण्याचे मौलिक काम करून नवनाथ कांबळे यांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे, असे मत यावेळी बोलताना  पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी व्यक्त केले व परिसरातील मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब ढमढेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या