चर्चाः शिरूर तालुक्यात चांगला चहा कोठे मिळतो?

Image may contain: coffee cup, drink and food
शिरूर, ता. 7 जून 2018: पावसाळा म्हटलं कि चिखल, गडबड, गर्दी, सर्दी, गरम भजी, कडक चहा, वडापाव, गाडीवरून धुराड रपेट, अंग अंग ओल, अंगभर ओले कपडे, साचलेले डपके, ओसंडून वाहणारा ओढा, भरलेले रस्ते, कौलावरून पडणारे पाणी, त्या कौलाखाली ठेवलेली बादली, तीपण तुडुंब भरून वाहणारी, डोक्यावर घेतलेले घोंगडं... बरचं काही ते पाऊस म्हटलं कि येते... पण.. पावसाळा सुरू झाला की सर्वप्रथम आठवण होते ती वाफाळलेल्या चहाची. चहामध्ये आलं, गवतीचहा टाकलेला असेल तर वेगळीच चव. सकाळी उठल्यापासून ते सायंकाळपर्यंत अनेकजण चहाची चव घेताना दिसतात. गरमागरम चहा नाक्यावर, हॉटेलमध्ये मिळतो.. पण उत्तम चहा कोठे मिळतो हे जाणून घेण्यासाठी 'भटकंती' पेक्षा चांगला मार्ग नाही.

शिरूर तालुक्यात चहाची लहान-मोठे अनेक हॉटेल्स अथवा गाड्या आहेत. पण... तुम्हाला माहित असलेला चहा नेमका कोठे मिळते. आणि चांगला चहा का आहे बरं? याबद्दल हॉटेलच्या नावाबरोबरच सविस्तर लिहा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या