दहावीचा निकाल 'या' वेबसाईटवर पहा..

Image may contain: text
शिरूर, ता. 8 जून 2018: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज 8 जून 2018 रोजी जाहीर होत आहे.

बोर्डाच्या http://www.mahresult.nic.in/  या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल पाहता येईल. तर SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे.

राज्यातील सुमारे 17 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

दहावीचा निकाल या वेबसाईटवर पहा...

कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या