शिरूर तालुक्यातील पाच गुन्हेगार वर्षासाठी तडीपार

Image may contain: one or more people, people standing and outdoor
शिरूर, ता. 8 जून 2018: रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव व तालुक्यात मारामारी, गुंडगिरी करणाऱया पाच सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

अजय ऊर्फ दादा शिवाजी गवारे (वय 25, रा. कारेगाव), मारुती बाळू करगुडे (वय 24, रा. कर्डेलवाडी), सचिन बबन आबनावे (वय 32, रा. कारेगाव), संकेत मारुती कर्डीले (वय 19, रा. कारेगाव), मयुर बाळू शेळके  (वय 22, रा. कर्डेलवाडी) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हे गुन्हेगारी कृत्य करणाऱया टोळीचे प्रमुख आहेत.

तडीपार करणअयात आलेल्या आरोपींवर रांजणगाव एमआयडीसी व तालुक्यात मारामारी, दहशत पसरविणे, गुंडगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुंडावर जरब बसावी यासाठी व एमआयडीसी परिसरात शांतता रहावी याकरीता त्यांच्या तडीपारीचा अहवाल पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पोलिस अधीक्षकांनी आरोपींना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

रांजणगाव पोलिस ठाम्याच्या हद्दीतील प्रत्येक गावातील गुन्हेगारांची यादी तयार केली असून, त्यांच्यावरही पुढील काळात अशा प्रकारची कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या