'ठराविक' जणांवर थेट तडीपारीची कारवाई का?

रांजणगाव गणपती, ता. 10 जून 2018 (तेजस फडके): "रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अनेक जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. परंतु त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होत नाही. पण.. ठराविक जणांवर थेट तडीपारीची कारवाई का? असा प्रश्न कारेगावच्या ग्रामस्थांना पडला आहे.

वैयक्तिक द्वेषापोटीच पाच जणांना नुकतेच १ वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असून, पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी हि कारवाई चुकीच्या पद्धतीने केली आहे, असा आरोप कारेगावचे सरपंच अनिल नवले यांनी केला आहे.

www.shirurtaluka.com शी बोलताना नवले म्हणाले, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत. त्याची पोलिस ठाण्यात नोंदही आहे. या गुन्ह्यात सामील असणाऱ्या आरोपींवर तडीपारीची कारवाई का झाली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तडीपार झालेल्या आरोपीवर कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत. तरीही त्यांच्यावर कारवाई होते हे न उलगडणारे कोडे असून, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.

याबाबत तत्कालीन पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता. ते म्हणाले, 'सदर आरोपींवर केलेली कारवाई हि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली असून त्यांनी मागितलेले सर्व कायदेशीर पुरावे व कागदपत्र त्यांना सादर केलेले आहेत.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या