चक्रीवादळामुळे पाणी उडाले आकाशी! (Video)

Image may contain: sky and outdoor
शिरूर, ता. 10 जून 2018: जेजुरी जवळच्या नाझरे धरणात शुक्रवारी (ता. 8) सायंकाळी आलेल्या टॉरनेडोनंतर अतिशय जोरदार पाऊस झाला. आकाशात झेपावणाऱ्या रॉकेटप्रमाणे ते भासत होते. रानमळा व परिसरातील ग्रामस्थ, तसेच धरणावरील पर्यटकांनी पाण्याचे हे वादळ मोबाईलमध्ये टिपले. सोशल मिडियावर तो व्हिडिओ व्हॉयरल होत आहे.

नाझरे धरणात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार नागरिकांना पाहवयास मिळाला. नाझरे धरणातील पाणी चक्रीय वादळामुळे आकाशात गोलाकार स्वरुपात काही मीटरपर्यंत उंच उडताना नागरिकांना पाहायला मिळालं. हा अद्भुत व्हिडीओ व्हिडीओ नाझरे धरणा जवळून जाणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. धरणाच्या पाण्यावर चक्रीवादळ घोंघावत असून पाण्याचे कारंजे उडाल्यासारखा भोवरा दिसत होता. पाणीही सरळ रेषेत वर जात होते. हे वादळ एवढे तीव्र होते, की धरणातील पाणी जलवाहिनीप्रमाणे ढगापर्यंत गेल्याचे दिसत होते. दूरपर्यंत पांढरी रेषा दिसत होती आणि आवाजही तेवढाच येत होता. या वादळानंतर परिसरात रात्री आठपर्यंत मुसळधार पाऊस झाला. हवेची पोकळी आणि कमी-अधिक दाबामुळे धरणातील पाणी उचलून वर खेचले गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हाळ्यातील चक्रीवादळे अनेकांनी पाहिली. त्यात पालापाचोळा आकाशात दूरवर जातो. मात्र, वादळात पाणी उचलून वर फेकले जाते, हे दृश्‍य नवीन होते. प्रथमच असे दृश्‍य अनेकांनी अनुभवले.

रानमळा परिसरातील ग्रामस्थ व धरणावर कुलधर्म-कुलाचारासाठी आलेले भाविक हे दृश्‍य पाहून अचंबित झाले. हे वादळ एवढे भयानक होते, की पाण्याजवळील मोटारींच्या पेट्या उंच व दूरवर जाऊन पडल्या. जगताप वस्ती परिसरातील काहींच्या घरांवरील पत्रे उडाले. हे वादळ धरणाच्या पाण्यावर असल्याने मोठी हानी झाली नाही. ते लोकवस्तीत शिरले असते तर मोठी हानी झाली असती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या