शिरुर तालुक्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

No automatic alt text available.शिरुर, ता. ११ जून २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी व शिरुर पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

शिरुर तालुक्याच्या दृष्टीने रांजणगाव व शिरुर हि दोन पोलीस ठाणी महत्त्वाची समजली जातात.रांजणगाव पोलीस स्टेशन ला अमरनाथ वाघमोडे हे कार्यरत होते तर शिरुर पोलीस स्टेशनला राजेंद्र कुंटे हे प्रभारी अधिकारी म्हणुन काम पाहत होते.रांजणगाव पोलीस स्टेशन चे अमरनाथ वाघमोडे यांची बदली जिल्हयाबाहेर साता-यात झाली आहे तर शिरुर पोलीस स्टेशनचे राजेंद्र कुंटे यांची विनंतीपुर्वक बदली तळेगाव दाभाडे एमआयडीसी करण्यात आली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला चाकन चे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव हे नुकतेच नियुक्त झाले आहे. शिरुर पोलीस स्टेशनला अद्याप नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही.

काही दिवसांपुर्वी शिक्रापुर पोलीस स्टेशनला संतोष गिरीगोसावी यांची नियुक्ती करण्यात आली होती.शिरुर तालुक्यात तीनही पोलीस ठाण्यांना नवीन अधिकारी नियुक्त होत असल्याने शिरुर तालुक्याची ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुर्ववत व्हावी अशी आशा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या