आर्ट अॉफ लिविंग कडून रांजणगावला स्वच्छता

Image may contain: 13 people, people smiling, people standing and outdoorरांजणगाव गणपती,ता.११ जुन २०१८(रावसाहेब चक्रे) : आर्ट आॅफ लिविंग मरकळ आश्रमातील  विद्यार्थिकडुन रांजणगाव गणपती परिसरात नुकतीच साफसफाई केल्याने संपुर्ण परिसर चकाचक झाला.

श्री श्री रविशंकरजी यांच्या संकल्पनेतून बलशाली स्वयंपूर्ण  भारत बनविण्याचा उपक्रम गावोगाव सुरू आहे.या मध्ये देशाचा कणा असणारा युवक ऊभा करणाचे काम युवा चेतना शिबिराच्या माध्यमातून सुरू आहे.शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी,धानोरे,विठ्ठलवाडी,पिंपरी दुमाला,कोंढापुरी, वाबळेवाडी निमगाव म्हाळुंगी आदि गावांमध्ये 100 युवकांनी ग्राम स्वच्छता,योग,प्राणायाम आणि व्यसनमुक्ती आरोग्याचे फायदे.पाण्याचा वापर आहाराचे महत्व आदि उपक्रमातुन सेवा केली.विशेषत: रांजणगाव परिसरातील मंदिर परिसरातील प्लास्टीक, कचरा यांची  ईतर स्वच्छता पाहुन ग्रामस्थ भारावून गेले.

महाराष्ट्रातील अनेक युवकांचा सहभाग आणि युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम तीक्ष्ण बुद्धी, प्राणशक्ति, आत्मविश्वास, निर्णयक्षमता,अफाट संकल्पशक्ती, प्रभावी व्याक्तिमत्व, वकृत्व कौशल्य शिकायला मिळाले असल्याची माहिती येथील विद्यार्थ्यांनी दिली.या उपक्रमांचे परिसरातुन कौतुक होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या