पलांडे आश्रमशाळेचा निकाल सलग दहाव्या वर्षी १०० टक्के

मुखई, ता.११ जुन २०१८ (प्रतिनीधी) : मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळेचा दहावीचा निकाल सलग दहाव्या वर्षी १०० टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम शिरसाट यांनी दिली.

विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकाचे गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- प्रथम -जयराम चांगदेव गिते( ८७.४ टक्के), द्वितीय - पुजा भिकू चव्हाण(८५.४ टक्के), तृतीय - निकिता संजय चोरमले(८२.८ टक्के). मुखई आश्रमशाळेत  सातत्याने नवीन विदयार्थी हिताचे व शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठीचे विविध उपक्रम राबविले जात असल्याने शाळेचा दहावीचा निकाल सलग दहाव्या वर्षीही शंभर टक्के लागला असल्याचे यावेळी बोलताना मुख्याध्यापक शिरसाट यांनी सांगितले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या जयश्रीताई पलांडे, कार्याध्यक्ष अॅड.अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोरे यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या