शिरुर पोलीस स्टेशनला येण्यास अधिका-यांची नकारघंटा ?

No automatic alt text available.
शिरूर, ता. १२ जून २०१८ (प्रतिनिधी) :  शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांची बदली होऊन दोन दिवस झाले तरी या भागात आर्थिक कमाई नसल्याने आता शिरूर पोलिस स्टेशनला नवीन पोलिस निरीक्षक मिळत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पुणे ग्रामिणचे पोलिस अधीक्षक सुवेज हक यात लवकर लक्ष घालणार का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सध्या शिरूर पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणुन राजेंद्र कुंटे असून त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदर त्यांची बदली झाली आहे. त्यांचा कार्यकाळ चांगला झाला नसला तरी वाईट ही झाला नाही.परंतु काही नागरिक त्यांचा संथ कार्यकाळामुळे नाराज असल्याने काही दिवसांपुर्वी त्यांनी वरीष्ठांकडे अर्ज वगैरे दिले होते.परंतु पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी स्वतः होऊन बदली करिता अर्ज दिला असल्याने त्यांची विनंती बदली झाली आहे, असे बोलले जात आहे. परंतु शिरूर पोलिस स्टेशन म्हणजे जांबुत ते तांदळी असे शंभर किलो मीटर ची हद्द असून, त्यातून काही दिवसांपूर्वी औद्योगिक वसाहत वेगळी झाल्याने शिरूर पोलिस स्टेशनला पोलिस अधिकारी यांच्या मते काही महत्व राहिले नसल्याचे बोलले जात आहे.

या भागात आर्थिक कमाई जास्त नसल्यामुळे येथे आता कोणी अधिकारी येण्यास तयार नसल्याचे चर्चेतून समजले असून शिरूर शहर व त्यांच्या शंभर किमी च्या आत मधे कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला असून येथील तरुणांमध्ये भाईगिरी ची हवा घुसली असून रोडरोमियो च्या संख्येत वाढ झाली आहे.तर अवैध प्रवासी वाहतूक, मटका या धंद्यात वाढ झाली आहे. कॉलेज रोडवर महिला, शाळकरी मुली असुरक्षित झाल्या असल्याचे भयावय चित्र आहे. यासाठी येथे सक्षम अधिकारी येण्याची गरज असून, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या सारखा कर्तव्यदक्ष अधिकारी देण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे. केवळ राजकीय दबावापोटी अधिकारी नको आहे. शिरूर पोलिस स्टेशनला लवकरात लवकर कार्यक्षम अधिकारी पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनी द्यावा म्हणजे शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी,अवैध धंदे, अवैध वाहतूक, रस्त्यावर सूरु असलेला मटका, रोड रोमीयो, मनमानी पार्किंग करणारे गुंठा मंत्री यांच्यावर वचक बसणर आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या