कंरजावणेमध्ये युवकाचा खून; दोन भावांना अटक

Image may contain: 7 people, people standing, tree and outdoor

करंजावणे
, ता. 13 जून 2018:
करंजावणे येथे प्रदीप कचरू साबळे (वय 35) यांना मारहाण व बेशुद्ध करून तलावातील पाण्यात टाकून खून केल्याप्रकरणी दोन भावांना बारा तासात पोलिसांनी अटक केली.

पुतण्या प्रदीप यांचा खून केल्याप्रकरणी अरुण बापू साबळे (वय 55) यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (ता. 11) सायंकाळी पुतण्या प्रदीप यास कोणीतरी अज्ञात आरोपीने ठार मारून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने गोधडीत गुंडाळून करंजावणे गावचे हद्दीतील शेततळ्या मध्ये टाकून दिले होते.

स्थानिक गुन्हे विभागाला मिळालेल्या माहिती वरून व तपास करून आरोपी अजित कचरू सरोदे (वय २७ रा. कारंजावने) यास ताब्यात घेउन त्याचेकडे अधिक तपास करता त्याने त्याचा भाऊ अक्षय कचरू सरोदे (वय २४) याचे मदतीने किरकोळ कारणावरून प्रदीपला लाकडी दंडक्याने मारहाण करून त्याचा खुन करून पुरावा नष्ट करणेचे हेतूने कारंजवणे गावाचे तळ्याचे पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींची वैदयकीय तपासणी करून रांजणगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे. या प्रकरणाचा तपास श्री. गिरीमकर, एच. सी घारे, नितीन गायकवाड, पोपट गायकवाड, राजू मोमीन व श्री. पवार यांनी केला.

दरम्यान, करंजावणे येथे खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (ता. 12) सकाळपासूनच अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले, दौंडचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी गावात तळ ठोकला होता. अवघ्या बारा तासांच्या आत दोघांना ताब्यात घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या