राहुल फटांगडेच्या चौथ्या मारेकऱयास अटक (Video)

Image may contain: 1 person, smiling, standing

कोरेगाव भीमा, ता.१३ जून २०१८(प्रतिनीधी) : कोरेगाव भिमा (ता.शिरुर) येथील दंगलीतील पिडित राहुल फटांगडेच्या संशयित आरोपीस पुणे पोलीसांनी अटक केली आहे.

सविस्तर असे कि,1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. तर या दंगलीत अनेक जण जखमीही झाले होते. तर सणसवाडीत जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या प्रकरणी या पुर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही पोलिसांच्या वातीनं सांगण्यात आलं होतं.दरम्यान नुकतंच पोलीसांनी आरोपींची रेखाचिञेही जारी केली होती. या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.पुणे पोलिसांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णीतून सुरज रणजीत शिंदेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपी पुण्यातील दौंड तालुक्यातील भीमनगरचा मूळ रहिवासी असल्याचे समजत असुन छायाचित्रातील बनियन घातलेल्या आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल बाबाजी फटांगळे (वय 30,रा.कान्हुन मसाई,ता.शिरूर) याच्या हत्येप्रकरणी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून तीन आरोपींना अटक केलेली आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यापैकी दोन जण अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तर एकजण औरंगाबादचा रहिवासी आहे. त्यांच्याविरुद्ध एप्रिल महिन्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर सीआयडीने आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्र व व्हिडिओ क्‍लिप प्रसिद्ध केले. त्या आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले होते. त्यातील हा एक संशयित असल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल फटांगळे हत्या प्रकरणी एक व्हिडिओ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) हाती आला आहे. या व्हिडीओमध्ये फटांगळेला काही व्यक्ती काठीने मारत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या आधारे सीआयडीने चार संशयितांची छायाचित्रे पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्ध केली होती. आरोपींबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी सीआयडीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. शिक्रापूर पोलिस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणाचा तपास 5 फेब्रुवारी रोजी सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. यामधील एक संशयीताबद्दल चतुःश्रृंगी पोलिसांना खबर मिळाली. हा संशयित दौंड येथील भीमनगर येथील मूळ रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातील टेंभुर्णीतून त्याला बुधवारी अटक करून सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या