राहुल फटांगडे च्या मारेक-यास पोलीस कोठडी

Image may contain: 1 person, smiling, standing

शिरुर
, ता.१५ जुन २०१८ (प्रतिनीधी) :
कोरेगाव भीमा दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या चौथ्या आरोपीस न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सूरज रणजित शिंदे (वय.२१) याला शिरुर न्यायालयासमोर (दि.१४) रोजी हजर करण्यात आले. यावेळी  शिरुर न्यायालयाने दिनांक २२ जून पर्यत शिंदे याला पोलिस कोठडी सुनावली.

एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती.या दंगलीत सणसवाडी येथील तरुण राहुल बाबाजी फटांगडे (वय ३०) याचा खून झाला होता. राहुल यांच्या खून प्रकरणी यापुर्वी  ग्रामीण पोलिसांनी तीन जणांना अटक केलेली आहे. फटांगडे यांच्या खून प्रकरणी चौथा आरोपी शिंदे यास पुणे पोलीसांनी अटक केला आहे.या गुन्हयाचा तपास सीआयडी करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या