विद्याधाममधील 'तो' शिक्षक पदावरून सेवामुक्त

Image may contain: one or more people
शिक्रापूर,ता.१५ जुन २०१८(प्रतिनीधी) : येथील विद्याधाममधील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील जानकर याच्या निलंबनासह त्याला शिक्षकपदावरून कायमचे सेवामुक्त करण्यात आले असून, तसा अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठविला आहे.

शिक्रापूर-विद्याधाममधील दहा शिक्षकांच्या बदल्या येत्या 1 जुलै दरम्यान करणार असल्याची माहिती शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तु. म. परदेशी यांनी दिली.

शिक्रापूर- विद्याधाममधील शिक्षक जानकर याने परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण वीस दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. याबाबत ग्रामस्थांनी संस्थेबाबत तीव्र आक्षेप नोंदवत शाळेतील आणखी काही शिक्षकांबाबत संशय व्यक्त करून अशांना गावात ठेवू नये, अशी मागणी केली होती. याबाबत स्वतंत्र ग्रामसभा घेऊन विद्याधाम संस्थाच गावात न ठेवण्याचाही ठराव घेण्यात आला होता.

याबाबत संस्थेचे सचिव तु. म. परदेशी यांनी सांगितले, की दोषी शिक्षक सुनील जानकर याचे आम्ही तडकाफडकी निलंबन केले असून, त्याला कायमचाच सेवामुक्त करण्याची कार्यवाही करून त्याचा अहवाल शिक्षण संचालकांकडे पाठविलेला आहे. त्याप्रमाणे साधारण दहा शिक्षकांच्या बदल्या येत्या 1 जुलैच्या बदली प्रक्रियेत इतर अन्य शाखांमध्ये केल्या जातील असेही सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या