रांजणगाव देवस्थानचे कामगार पगारापासुन वंचित

रांजणगाव गणपती,ता.१५ जुन २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती  देवस्थान मधील कामगार मे महिन्याच्या पगारापासुन वंचित असल्याची माहिती भारतीय मजदुर संघाचे बाळासाहेब भुजबळ यांनी यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे दिली आहे.

भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनानुसार,रांजणगाव गणपती देवस्थान मध्ये गेल्या अनेक वर्षांपासुन काम करत असलेल्या कायमस्वरुपी सेवेत असलेल्या कामगारांचा माहे मे २०१८ चा पगार अद्याप जाणीवपुर्वक दिला नसल्याचे म्हटले असुन देवस्थानची आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही त्यांना पुरेसे वेतन अन्य सेवा सुविधा देण्यात येत नाही,सेवकांनी एकञित येउन केवळ संघटना केली म्हणुन मुद्दामहुन वारंवार बदल्या करणे,रजा मंजुर न करणे,चुकिच्या शिफ्टशेडयुल लावणे,कर्मचा-यांचे पगार कापणे, रजा मंजुर न करणे, कामगाराची अडवणुक करुन युनियनचे राजीनामे असा ञास दिला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पेमेंट अॅक्ट वेजेसनुसार दर महिन्याच्या ७ तारखेपुर्वी कामगाराचा पगार करणे बंधनकारक असतानाही व्यवस्थापन कायदा पायदळी तुडवुन महिन्याच्या ७ तारखेनंतर पगार करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या महिन्यात कामगारांच्या मुलांच्या शाळा  सुरु होत  असुन शाळेचे प्रवेश घेणे,गणवेश खरेदी,वह्या-पुस्तके व फी भरण्यासाठी पैशांची गरज आहे.कामगारांबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही जाणिवपुर्वक व्यवस्थापन ञास देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या कृती जर मुलांना शाळेत प्रवेश मिळाला नाही  व कामगारांची मुले शिक्षणापासुन वंचित राहिल्यास त्यास देवस्थान जबाबदार राहिल.त्याचप्रमाणे याबाबत कामगार उपायुक्त यांना  निवेदन देण्यात आले असुन कामगारांचा पगार त्वरीत जमा करा,अन्यथा संघटनेला आंदोलनात्मक भुमिका लागेल असा  इशारा संघटनेचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे दिला आहे.

दरम्यान रांजणगाव देवस्थान चे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, कामाचे वेळापञक बदलल्यानंतर जे कामगार कामचुकारपणा करत होते, वेळा न पाळता काम करत होते, अशा कामगारांचा पगार स्थगित केला असुन चौकशी केल्यानंतर नियमित पगार दिला जाईल. प्रामाणिक कामगारांवर अन्याय होणार नाही. उशिराबद्दल ञास झाल्याबदद्ल देवस्थानच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत असल्याचे डॉ. दुंडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या