शिरुर तालुक्यातील जळालेल्या पिकांचे पंचनामे करा

Image may contain: one or more people, people standing, sky, grass, outdoor and nature
शिरुर, ता.१५ जुन २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील पाण्याअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शिरुर तालुका शेतकरी सेनेच्यावतीने करण्यात आली.

शिरुर तालुका  शेतकरी सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील कोळगाव डोळस, निर्वी, कोकडेवाडी,या भागात कॅनॉलला पाणी न आल्याने पाण्याअभावी शेतक-यांची शेतातील उभी पिके जळाली असुन पावसानेही दडी मारली आहे.हा विषय शेतक-यांचा उदरनिर्वाह असुन त्यांचे वार्षिक आर्थिक गणित कोलमडले आहे.

कष्टाने पिकविलेला शेतमाल पाण्याअभावी जळुन गेला आहे.त्या शेतक-यांच्या शेतपिकांचे त्वरीत पंचनामे होण्याकरिता  सदर अधिका-यांना  सुचना देण्यात याव्या,सदर शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत शेतकरी सेना पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना शेतकरी सेना तालुका प्रमुख योगेश ओव्हाळ यांनी सांगितले.या बाबत  मागण्यांचे निवेदन शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांना दिले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या