शिरुरच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची बदली

https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/35356749_1688625777896218_8890228620753108992_n.jpg?_nc_cat=0&oh=b509864e4b3bedcae14f383abe14302b&oe=5BB95805
शिरुर, ता. १५ जून २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची नुकतीच बदली झाली आहे.

विद्यादेवी पोळ या गेल्या काही वर्षांपासुन शिरुर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत होत्या. पोळ यांची बदली सातारा जिल्हयात वाई येथे झाली आहे. तर मलकापुर येथे असलेले मुख्याधिकारी ॲलिस पोरे हे शिरुरचे नवे मुख्याधिकारी असणार आहेत.दोन वर्षापुर्वी पोळ या मुख्याधिकारी म्हणून हजर झाल्या होत्या.

गेल्या काही दिवसापासून त्यांच्या बदलीची चर्चा होती.त्यांच्या बदलीनंतर शिरुर शहराला चांगला मुख्याधिकारी मिळावा यासाठी नागरिक प्रयत्न करत होते.त्यामुळे शिरुर शहरात नवे मुख्याधिकारी यांच्याकडुन चांगल्या कामाची अपेक्षा करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या