कावरे बावरे चेहरे अन चॉकलेट ने नवागतांचे स्वागत

Image may contain: 1 person, on stage, wedding and outdoorशिरसगाव काटा, ता.१६ जुन २०१८(प्रतिनीधी) : कावरे बावरे चेहरे..काहीसा चिमुकल्यांच्या चेह-यावर आनंद अशाप्रकारचे चिञ  शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वञ पहायला मिळत होते.

शिरुर तालुक्यात सर्वञ शाळेच्या पहिल्या दिवशी असाच काहिसा अनुभव येत होता.शाळेचा पहिला दिवस असल्याने अंगणवाडीतुन बढती मिळालेली चिमुकली मुले प्राथमिक शाळेत जाताना पहायला मिळत होती.या वेळी चिमुकल्यांना पहिल्याच दिवशी शाळेत सोडायला येणा-या पालकांची काहीशी धांदल उडत  असल्याचे पहायला मिळत होते.काही विद्यार्थी नवीन ड्रेस, मुले शाळा यांत हरखुन गेली होती.तर कावरेबावरे चेहरे पहायला मिळत होते.पहिल्याच दिवशी नवीन शाळेत रुजु झालेल्या शिक्षकांची माञ तारांबळ उडत असल्याचे चिञ काही ठिकाणी दिसत होते.

शिरसगाव काटा येथील शाळेत ग्रामस्थांनी नवागतांचे स्वागत चॉकलेट देउन केले.त्याचप्रमाणे पहिल्याच दिवशी ग्रामस्थांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देण्यात आली.शिरसगाव काटा येथील शाळेत नवागतांच्या स्वागताला घोडगंगा  कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, सरपंच सतीश चव्हाण, माजी सरपंच संजय शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल कदम, उपाध्यक्षा साधना जगताप, उपसरपंच प्रकाश जाधव,तंटामुक्ती चे अध्यक्ष विजय जगताप,सोसायटीचे संचालक सुभाष गद्रे,माजी सरपंच रामचंद्र केदारी,यांसह शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या