शिरुर तालुक्यात रमजान र्इद उत्साहात साजरी

शिरुर,ता.१७ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात एकमेकांना  शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

शिक्रापूरसह परीसरातील सणसवाडी, धानोरे, दरेकरवाडी, पिंपळे जगताप, करंदी, केंदुर, मुखर्इ, कान्हूर मेसार्इ, निमगाव म्हाळुंगी, जातेगाव, कोंढापुरी, कारेगाव, दहीवडी, पारोडी, उरळगाव, न्हावरे, करडे, निर्वी आदी ठिकाणी मोठया उत्साहात नमाज पठण करून र्इद साजरी केली.र्इद हा सण हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते त्यामुळे अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना र्इदगाह वर हजर राहून तसेच घरोघरी जावून शुभेच्छा दिल्या.महीनाभराच्या उपवासानंतर हा सण साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सामाजीक सलोखा राखण्याच्या दॄष्टिने रमजान र्इदला विशेष महत्व असल्याने यातून शांततेचा व एकतेचा संदेश दिला जातो.नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रामध्ये शांतता रहावी व सर्वधर्मीय एकोपा रहाण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

शिरुर : हा सण हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना घरोघरी जावून ईदच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव कब्रस्तान मस्जिद मध्ये ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले.त्या ठिकाणी शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे,माजी आमदार अशोक पवार यांनी सर्व मुस्लिम बांधवांना अलिंगन देउन शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम जमात चे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर यांनी आमदार पाचर्णे व माजी आमदार अशोक पवार यांचा सत्कार केला.यावेळी विद्यमान नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, माजी नगराध्यक्ष नसीम खान, चांदभाई बळभट्टी,महंमद हुसेन पटेल,एजाज बागवान,नामदेव घावटे, केशव लोखंडे, राजु शेख, मितेश गादिया,बाबुराव पाचंगे आदी उपस्थित होते.

शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे,उपनिरीक्षक भगवान पालवे, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, संतोष कदम,संतोष औटी,महिला पोलीस कर्मचारी अनारसे,बनकर आदींच्या हस्ते मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देउन शुभेच्छा देण्यात आल्या. महीनाभराच्या उपवासानंतर हा सण साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सामाजीक सलोखा राखण्याच्या दॄष्टिने रमजान र्इदला विशेष महत्व असल्याने यातून शांततेचा व एकतेचा संदेश दिला जातो.नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रामध्ये शांतता रहावी व सर्वधर्मीय एकोपा रहाण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या