आर्यनला औषधोपचारासाठी दानशूरांकडून मदत

विठ्ठलवाडी, ता. १७ जून २०१८(प्रतिनीधी) : विठ्ठलवाडी येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या  ७ वर्षाच्या आर्यनला औषध उपचारासाठी दानशूरांकडून आर्थिक मदत देण्यात आली.        

आर्यनच्या  दुर्धर आजारासंदर्भात www.shrirutaluka.com ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेत रांजणगाव गणपती  येथील  युवा उद्योजक  माऊली पाचुंदकर यांनी  अकरा हजार रुपयांचा धनादेश  या मुलाच्या उपचारासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन  आई व मुलगा आर्यन यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी त्यांच्या समवेत आलेले ग्रामपंचायतीचे  सदस्य राजेंद्र नवले, रांजणगाव ग्रामपंचायतीचे  माजी सदस्य  विलासराव फंड, उद्योजक  रवींद्र जगदाळे  या मित्रांनीही  या मुलाची आर्थिक परिस्थिती पाहून व उपचाराचे गांभीर्य ओळखून  पाच हजार पाचशे  रुपयांची  आर्थिक मदत औषधोपचारासाठी केली. समाजामध्ये  सामाजिक बांधिलकी ठेवून कुठेतरी माणुसकी असल्याचे ज्वलंत  उदाहरण  यावरून दिसून येते.

दानशूरांनी केलेली मदत  ही लाख मोलाची असून या मुलावर  योग्य उपचार झाल्यास  त्याचे आयुष्य  सुकर होण्यास  मदत होईल. सात वर्षाच्या चिमुकल्या आर्यनला मात्र थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. या लहानग्यास पंधरावड्यात रक्त भरूनच नवसंजीवनी देऊन ही माता आपल्या प्रपंचाचा गाडा चालवीत आहे. शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी मध्ये नीता सूचित लोंढे ही युवती नवरा सांभाळत नसल्याने वडील रावसाहेब म्हस्के यांच्याकडेच राहत असून गवत कापण्याचे व मोलमजुरीचे काम करून दोन मुलांना शिक्षण देत सांभाळ करीत आहे.सम्यक लोंढे इयत्ता चौथीमध्ये तर दुसरा आर्यन लोंढे हा इयत्ता दुसरी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी याठिकाणी शिक्षण घेत आहेत. नीता लोंढे मोलमजुरी करत दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या