शिरूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत...

Image may contain: mountain, sky, grass, cloud, outdoor and nature
शिरूर, ता. 18 जून 2018 (संपत कारकूड): हवामान खात्याने दिलेला 72 तासांचा मान्सून प्रवास अद्याप शिरुर तालुक्यात पोचला नाही. अत्तापर्यंत कोणताही मोठा पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी अद्यापही पाऊसाच्या प्रतिक्शेत आहे.

संपूर्ण शिरुर तालुक्यात अद्याप कोणत्याही मोठया पावसाची नोंद झालेली नसून, तालुक्यातील उन्हाळा अद्यापही मोडला नाही. मान्सुन पुर्व पाऊस असो, की मान्सुन असो, अद्याप पाऊस असा पडला नसल्यामुळे येथील शेतकऱयाला अद्यापही आपल्या पिके शेवटचे पाणी देवून जिवंत ठेवावी लागताना दिसत आहेत. सध्या जोराचा वारा व उकाडयाचा मोठया प्रमाणात होणाऱया त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस नेमका कधी? असा येथील प्रत्येक शेतकऱयाला पडलेला प्रश्न आहे.

नदीच्या अथवा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱया शेतकऱयांनाही आता पावसाची मोठी गरज वाटू लागली आहे. नदीवर असणारे बंधाऱयांचे लोखंडी गेट काढून टाकल्यामुळे नदीची पाणी पातळीही अत्यल्प झाली आहे. शेतकऱयांनी शेवटचे पाणी फिरविल्यानंतर आता पावसाची चिंता लागली असून, पाऊस मात्र अद्यापही सुरू झालेला नाही. सध्यातरी पाऊस पडेला का? याची खात्री कोणत्याही शेतकऱयाला देता येत नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या