दफनभुमीसाठी जागा देण्याची गोसावी समाजाची मागणी

शिरुर,ता.१९ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुर येथील सर्वे नं २७२ मधील हिंदु स्मशानभुमी आरक्षित जागा गोसावी समाज दफनभुमीसाठी देण्याची मागणी गोसावी समाजाने शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,शासनाने सर्व जिल्हाधिकारी  यांना जिल्हयात दफनभुमीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असुन संदर्भ क्र.२ अन्वये मार्गदर्शक सुचनांद्वारे दफनभुमी हि शासकिय सुविधा म्हणुन देण्याबाबत शासनाचे धोरण/योजना स्पष्ट करुन दफनभुमी उपलब्ध करुन देण्याबाबत  निर्देश देण्यात आले आहेत.तसेच वार्षिक योजनेंतर्गत दफनभुमीसाठी पोहोच रस्ता,पाणी,सुशोभिकरण,कंपाउंड देण्याबाबत शासनाने स्पष्ट सुचना दिल्या आहेत.

तरी शिरुर येथे गोसावी समाजाला दफनभुमीसाठी जागा कमी पडत असुन सर्व्हे नं २७२ मधील ७० गुंठे जागा हिंदुची स्मशानभुमी आरक्षित जागा आहे.तरी या जागेमधील २० गुंठे जागा गोसावी समाज दफनभुमीसाठी वाढती लोकसंख्या लक्षात घेउन देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी गोसावी समाज ट्रस्टचे सचिव रवि गोसावी,राकेश परदेशी, भाजपचे  अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस राजु शेख, भाजपचे शहराध्यक्ष केशव लोखंडे,स्वप्निल गोसावी आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या