शिरसगावला शेतातुन २०० कांदागोण्या चोरीस

शिरसगाव काटा,ता.१९ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथील शेतक-याच्या शेतातुन सुमारे ऐंशी हजार रुपये किंमतीच्या २०० गोण्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी रामदास शंकर जाधव यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथील रामदास जगताप यांनी पाच एकर शेतात कांदा लागन केली होती.कांद्याला दर नसल्याने कांदा  काढणी करुन कांदा लाल नायलॉनच्या पिशव्यांमध्ये भरुन थप्पी लावुन त्यावर उसाचे पाचट टाकुन झाकुन ठेवला होता.(दि.१६) रोजी राञीच्या सुमारास जगताप यांनी स्टॉक करुन ठेवलेल्या कांद्याजवळ जाउन पाहिले असता सर्व पिशव्या जागीच होत्या.

त्यानंतर (दि.१७) रोजी सकाळी पुन्हा कांद्याच्या पिशव्यांच्या स्टॉक जवळ जाउन पाहिले असता,काही पिशव्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या.व एकाबाजुने थप्पीच्या पिशव्या कमी झालेच्या दिसल्या.सुमारे सहाशे पिशव्यांपैकी दोनशे पिशव्या कमी दिसुन आल्या तर शेतात चार चाकी वाहनाचे टायर मार्क व माणसांच्या पावलांचे वण दिसले असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली असुन पुढील तपास मांडवगण पोलीस चौकीचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या