'एमपीडीए' च्या कारवाईने वाळुचोरांची वाळुच सरकली

शिरुर,ता.१९ जुन २०१८(प्रतिनीधी) : पुणे व नगर जिल्हयात प्रथमच वाळु चोरावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केल्याने वाळुचोरांच्या पायाखालची वाळुच सरकली आहे.

नगर जिल्हा प्रशासनाने एकवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.गेल्या काही वर्षात शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हयात व नगर जिल्हयात वाळुचोरांनी नद्यांची अक्षरश: वाट लावुन टाकली आहे.याच वाळुचोरांकडुन अनेकदा नागरिकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे नागरिक सहजासहजी वाळुमाफियांच्या भितीपोटी तक्रार द्यायला पुढे येत नाही.पुणे जिल्हयात या पुर्वी वाळु चोरांकडुन गंभीर गुन्हे घडल्याचे दिसुन आले असुन राजरोसपणे चोरी व धमकावण्याचे प्रकार घडुनही कोणीच काही करु शकले नव्हते.

शिरुर तालुक्यात भिमा व घोड नद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची वाळु उपलब्ध होत  असल्याने वाळु चोरांनी शिरुर तालुक्यात चांगलाच हैदोस माजवला असुन याला बडया धेंड्यांचांही आशिर्वाद असल्याचे अनेकांनी वारंवार पाहिले आहे.अनेक ठिकानी आजही राजरोसपणे चोरी होत असताना महसुल विभाग माञ जुजब्या प्रकारची कारवाई करत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. एमपीडीए  कायद्यांतर्गत वाळुचोरांवरही स्थानबद्धतेची कारवाई होणार असल्याने वाळुचोरांची पायाखालची वाळु सरकली असुन चांगलेच धाबे दणाणले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या