इनामगावला ग्रामपंचायतीकडुन स्ञी जन्माचे स्वागत

इनामगाव,ता.२० जुन २०१८(प्रमोल कुसेकर): इनामगाव (ता.शिरुर)ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रमांनी स्ञी जन्माचे स्वागत केले.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन  समितीच्या सभापती सभापती सुजाता पवार ह्या उपस्थित होत्या.महिलांनी दैनंदिन सवयीत बदल करुन आहारात विशेष लक्ष द्यायला हवे असे आवाहन सुजाता पवार यांनी केले.

यावेळी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गदादे,घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा.सुभाष कळसकर,श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे,सुवर्णा पाचपुते,मनिषा सोनवणे,डाँ.जे.बी.मारणे,सरपंच मंगल म्हस्के,शिवाजी मचाले,प्रतिभा बोञे यांची भाषणे झाली.मांडवगण फराटाचे सरपंच शिवाजी कदम, सिमा फराटे,गोरख गदादे ,नानासाहेब घाटगे,हमीद शेख आदी यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या