गुजर प्रशालेचे ८ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र

Image may contain: 13 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. २० जून २०१८ (प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील आठ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे : ऐश्वर्या राऊत, हर्षला जाधव, सलोनी केदारी, शुभांगी बनसोडे, तन्मयी सायकर, वैष्णवी भगत, यशस्वी पाटील, विनायक शिंदे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे वार्षिक १२ हजार शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक माणीक सातकर यांनी सांगितले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रविंद्र सातपुते, नंदा सातपुते, सुरेन्द्र दुबे, अर्चना गोरे, अरुण भगत यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संचालक महेश ढमढेरे, प्राचार्य माणीक सातकर, उपप्राचार्य जगदीश राऊतमारे, पर्यवेक्षक राजाराम पुराने, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख शिवाजीराव  आढाव यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या