शिरसगाव काटा मध्ये कृषिदूताचे स्वागत

Image may contain: 9 people, people smiling, people standingशिरसगाव काटा,ता.२० जुन २०१८(प्रतिनीधी) : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शिरसगावात आलेल्या कृषीदुतांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रम अंतर्गत शिरसगाव काटा गावाची निवड करण्यात आलीआहे.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक नरेंद्र माने व सरपंच सतिष चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून तर माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे अध्यक्षस्थानी होते व सर्व ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विध्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रम अंतर्गत वीस आठवडे घेतले जाणारे उपक्रमाची माहिती दिली.तसेच नरेंद्र माने यांनी शेकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निंबाळकर सर यांनी ग्रामीण कार्यनुभवाची माहिती दिली.कार्यक्रम समन्यवक म्हणून प्रा. लोंढे मॅडम होत्या.या प्रसंगी कृषिदूत तुषार घोडे, राहुल कोल्हे, निखिल राऊत,कासार वैभव,सुजित टुले उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर खाटीक यांनी केले तर आभार कृषिदूत निखिल रणदिवे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या