श्री गजानन हॉस्पिटलच्या वतीने मोफत तपासणी (Vdo)

रांजणगाव गणपती, ता. २० जुन २०१८ (प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती येथील श्री गजानन हॉस्पिटलने आयोजित केलेल्या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

रांजणगाव येथील श्री गजानन हॉस्पिटल येथे वेलनेस पोलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत संधिवात तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागपुर येथील डॉ. बी. बी. कुमार यांनी रुग्णांची प्रामुख्याने संधिवात व हाडांची तपासणी केली. त्याचप्रमाने सांधे दुखणे, ह्रदयासंबंधी संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, मनक्याचे आजार, गुडघेदुखी, टाचदुखी, सुज यांवर निदान केले.

या शिबिरात सुमारे २५० हुन अधिक गरजु रुग्णांनी लाभ घेतल्याचे श्री गजानन हॉस्पिटलचे डॉ. अंकुश लवांडे यांनी सांगितले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमानावर गर्दी केली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या