...तर बाह्यवळण मार्गास पर्याय काढला जाईलः बापट

Image may contain: 3 people, people sitting
तळेगाव ढमढेरे, ता.२१ नोव्हेंबर २०१८ (प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन प्रस्तावित बाह्यवळण मार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता त्यावर पर्यायी मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली. या संदर्भात पी.एम.आर.डी.ए., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बाधित शेतकरी यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन ना.बापट यांनी दिले.

चाकण - शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे - न्हावरा - चौफुला या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्या सुरु आहे. शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे या गावाजवळील बाह्यवळण मार्ग या गावातील रहिवाशी झोनमधून प्रस्तावित केलेलाआहे. त्यामुळे अनेक शेतकरी बाधित होणार असून या बाह्यवळण मार्गाला विरोध करीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे येथे पालकमंत्री गिरीष बापट यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर बापट यांनी सविस्तर चर्चा करताना बाधित शेतकऱ्यांवर सरकार अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.चाकण - शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे - न्हावरा - चौफुला या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचे शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील बाह्यवळण रहिवासी झोनमधून जात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे वाकडे तिकडे तुकडे होत असून, भविष्यात बाजूच्या  उर्वरित जमिनींवरील विकासाला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व त्यांच्या  पुढील पिढ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. तसेच प्रस्तावित बाह्यवळण मार्गालगत रिलायन्स कंपनीची वायू वाहिनी असून भविष्यात तिथे धोकाही उद्धभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबी शिष्टमंडळाने यावेळी ना. बापट यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

या प्रस्तावित बाह्यवळण मार्गाला पर्याय म्हणून पी.एम.आर.डी.ए. ने प्रस्तावित केलेले बाह्यवळण रस्ते उपयुक्त ठरणार असून, त्यावर विचार व्हावा अशी मागणी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे  केली आहे. यावर शिष्टमंडळाने सुचवलेले पर्यायी मार्ग योग्य वाटत असून, यासंदर्भात पी.एम.आर.डी.ए.,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व बाधित शेतकरी यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेवू आणि त्यावर एक सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी भुजबळ, काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य कौस्तुभकुमार गुजर, तळेगाव ढमढेरेचे माजी सरपंच पोपटराव भुजबळ, शेतकरी कृती समितीचे निमंत्रक रामदास भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, हनुमंत भुजबळ, ज्ञानेश्वर खेडकर, वसंत जकाते, रमेश भुजबळ आदींचा समावेश होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या