प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका शुल्क घेणे थांबवा

शिरुर, ता.२१ नोव्हेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरूर शहर व शिरूर तालुक्यात अकरावी प्रवेश अर्ज़ व माहिती पुस्तिका महाविद्यालय शुल्क आकारत असून असे शुल्क घेणे तातडीने थांबवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिरुर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला.

या संबंधी निवेदन शिरुर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांना देण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, शिरुर शहर व शिरुर तालुक्यातील शाळा महाविदयालयांमध्ये सध्या ११ वी प्रवेशाची धावपळ दिसून येत असुन आपल्या पाल्याचा प्रवेश होण्यासाठी पालक महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज़ घेत आहे.पालक व विद्यार्थी यांच्याकडुन त्या प्रवेश अर्जासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयात अर्जासाठी आपआपल्या परीने  पैसे आकारले जातात. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आदेशानूसार अशी फी पैसे घेउ शकत नाही असे त्या आदेशामध्ये नमुद केले आहे.

तरीदेखिल आपल्या तालुक्यात असणा-या शाळा महाविद्यालये पालक व विदयार्थ्यांकडुन बळजबरीने अडवणुक करुन त्यांच्याकडुन पैसे आकारले जात आहेत.सदरचे जी महाविदयालये असे पैसे आकारत आहेत.त्यांना ते थांबवण्याचे तातडीने आदेश काढुन विद्यार्थी व पालकांची लुट थांबवावी तसेच नियमांचे उल्लंघन करुन बेकायदा रक्कम जमा करणा-या शाळा महाविद्यालयांवर त्वरीत कठोर कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे,मनविसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या