शिरुर तालुक्यातील पोलीस अधिका-यांच्या मोठया बदल्या

No automatic alt text available.शिरुर,ता.२१ जुन २०१८(सतीश केदारी) : नव्याने रुजु झालेल्या शिक्रापुर पोलीस निरीक्षकांची अचानक बदली करण्यात आली असुन शिरुर व शिक्रापुर पोलीस स्टेशन ला अन्य पोलीस अधिका-यांच्या बदल्या व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या जागेवर काही दिवसांपुर्वी शिक्रापुर पोलीस स्टेशन ला संतोष गिरीगोसावी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या विनंतीपुर्वक बदलीनंतर नव्या पोलीस निरीक्षकाच्या प्रतिक्षेत शिरुर पोलीस ठाणे होते. शिरुर पोलीस स्टेशनला सदाशिव शेलार यांच्या नावाचीच जास्त चर्चा होती.

दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी तातडीने बदलीचे आदेश काढले असुन शिक्रापुर पोलीस स्टेशनला पुर्वी सांगली येथे नेमणुक असलेले सदाशिव गोविंद शेलार यांची पोलीस निरीक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. तर शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांची बदली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला झाल्याने त्यांच्या जागी जुन्नर पोलीस स्टेशनला नेमणुक असलेले कैलास घोडके यांची विनंती बदलीने शिरुर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे.त्याचबरोबर शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील यांचीही कार्यकाळ संपल्याने बदली करण्यात आली असुन विनंती बदलीने त्यांची कामशेत पोलीस स्टेशनला नेमणुक करण्यात आली आहे. तसेच शिरुर पोलीस स्टेशनला गेल्या काही वर्षांपासुन उत्तम भजनावळे यांच्यानंतर सहायक पोलीस निरीक्षकाचे पद रिक्त होते.त्या जागी नागपुर शहर पोलीस स्टेशनला नेमणुक असलेले अर्जुन केशव घोडेपाटील यांची शिरुर पोलीस स्टेशनला सहायक पोलीस निरीक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे.तसेच सांगली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल बाळासाहेब शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हनुन शिरुर पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनला सांगली ला नेमणुक असलेले पोलीस उपनिरीक्षक मनोज कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची अचानक बदली झाल्याबाबत संपर्क साधुन बदलीबाबत विचारले असता, माझी तत्काळ व तात्पुरती नेमणुक शिक्रापुर पोलीस स्टेशनला  करण्यात आली होती असे बोलताना त्यांनी सांगितले.कोरेगाव भिमा दंगलीनंतर शिक्रापुर पोलीस स्टेशनला चांगला अधिकारी मिळावा अशी नागरिकांची मागणी होती तर गिरीगोसावी यांनीही थोड्या दिवसांत चांगल्या कामाची चुणुक दाखविली होती.शिरुर तालुक्यात सर्वच पोलीस ठाण्यात नवीन अधिका-यांच्या नेमणुका झाल्याने शिरुर तालुक्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुर्ववत व्हावी अशी आशा नागरिकांकडुन व्यक्त केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या