शिरुरच्या आंधळे डॉक्टर दांपत्याचा विशेष सन्मान

Image may contain: 4 people, people standing and indoorरांजणगाव गणपती, ता. २४ जुन २०१८(प्रतिनीधी) : शिरुरच्या आंधळे डॉक्टर दांपत्याचा रांजणगाव येथील स्ञी साहित्य संमेलनात विशेष सन्मान करण्यात आला.

डॉ. सतीश आंधळे व डॉ. अर्चना आंधळे हे गेल्या काही वर्षांपासुन शिरुर तालुक्यात मुलगी जन्माला आली कि प्रसुतीचा खर्च पुर्णपणे मोफत असे अभियान राबवत असुन या अंतर्गत  आजतागायत सुमारे २०० च्या वर मोफत प्रसुती करण्यात मुलींना जन्म दिला आहे.त्याचबरोबर मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेउन स्ञी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानपञ देउन डॉ.सतीश व अर्चना यांचा गौरव करण्यात आला.

डॉ.सतीश व अर्चना आंधळे यांच्या या कार्याचा या पुर्वी प्रसिद्ध डॉ.गणेश राख यांनीही कौतुक केलेले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या