मार्शल आर्ट मध्ये 'दिव्या' ला सुवर्णपदक

Image may contain: 1 personशिरुर,ता.२५  जुन २०१८(सतीश डोंगरे) : मार्शल आर्टच्या विविध प्रकारात शिरुर येथील दिव्या लक्ष्मण कोळी हीने सुवर्णपदक पटकावले.

कोल्हापूर येथे पार पडलेल्या या मार्शल आर्ट पंच व कता या कराटे विश्वविक्रमी स्पर्धेत देशाच्या विविध भागातील एकूण ५६१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.दिव्या ही इंडीयन तायक्वांदो अॅंड किक बॉक्सिंग असोसिएशनची(आय टी के बी) विद्यार्थीनी आहे. 'आय टी के बी' चे संचालक मास्टर अकबर शेख यांनी तिला मार्गदर्शन केले.

दिव्या हीने मिळविलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिरुर शहर परिसरातून तसेच हवेली तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिरुर येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात दिव्याला माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, नगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. कमल सावंत, नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.दिव्या ही व्हर्लपूल अॉफ इंडिया कंपनीतील अधिकारी लक्ष्मण कोळी यांची कन्या आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या