दिल्लीत शिरुर तालुक्यातील खेळाडूंचे नेञदिपक यश

Image may contain: 8 people, including Abhijeet Ganesh Pacharne, people smiling, people standingरांजणगाव गणपती,ता.२५  जुन २०१८(प्रतिनीधी) : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कराटे स्पर्धेत शिरुर तालुक्यातील शिक्रापुर व गणेगाव च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.

याविषयी सविस्तर माहिती अशी कि, नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये (दि.२२ ते २४ जुन) दरम्यान दिल्ली ओपन कराटे चॅंपियनशीप च्या स्पर्धा खेळविण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये शिरुर तालुक्यातील खेळाडुंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.  शिक्रापुर व गणेगाव खालसा येथील शोतोकॉन ग्लोबल कराटे अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेत वैष्णवी बेंडभर हिने सुवर्णपदक कमावले.तर गौरव बोराडे,चेतन पवार यांनी रौप्य पदकाची कमाई केली.आदित्य बोराडे,समर्थ चौधरी,साहिल जाधव,गणेश दाते यांनी कांस्य पदक पटकाविले.कुमिते प्रकारात गणेश दाते याने रौप्य तर साहिल जाधव व चेतन पवार यांनी कांस्य पदक पटकाविले.या सर्व खेळाडूंना कराटे प्रशिक्षक सोमनाथ अभंग  यांनी मार्गदर्शन केले व सिताराम चव्हाण,मंगेश सासवडे यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या