तळेगावला १ हजार २०० वह्यांचे मोफत वाटप

Image may contain: 25 people, people standing and outdoorतळेगाव ढमढेरे, ता.२६ जुन २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील जिल्हा परिषद प्राथ.शाळेत १ हजार २०० वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

तळेगाव ढमढेरे  (ता. शिरूर) येथील वार्ड क्रमांक ४ मधील ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने सोमवार(दि.२५ जून) रोजी जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या  वह्यांचे यावेळी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास दादा नरके यांनी माळी मळा जिल्हा परिषद प्राथ.शाळेला आर्थिक साह्य म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

या कार्यक्रमास शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, सरपंच ताई सोनवणे, माजी उपसरपंच राकेश भुजबळ, उपसरपंच उज्वला भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या जयश्री नरके, महेश भुजबळ, तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष कैलासदादा नरके, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग नरके, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भुजबळ, लक्ष्मण नरके, संतोष भुजबळ, काळूअण्णा भुजबळ, धनंजय नरके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सचिन नरके व योगेश जगताप यांनी केले.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या