आयडियाने धाडला ३५ हजार रुपये थकित बीलाचा संदेश

Image may contain: textशिरुर, ता.२६ जुन २०१८ (प्रतिनीधी) : आयडिया कंपनीने शिरुर तालुक्यातील एका पोस्टपेड ग्राहकाला चक्क ३५ हजार रुपये थकित बिलाचा संदेश पाठविला असल्याचे नुकतेच उघड आले.

याबाबत सविस्तर असे कि शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील सतीश केदारी हे आयडिया कंपनीचे नियमित पोस्टपेड ग्राहक आहेत.ते  गेल्या अनेक वर्षांपासुन पोस्टपेड प्लॅन चा वापर करतात.यांचे गेल्या महिन्याचे ४५४ रुपये बिल थकित होते.आयडिया कंपनीने त्यांना (दि.२२ जुन) रोजी दुपारी अडिच वाजता थोडे नव्हे तर चक्क ३५ हजार ३३ रुपये थकित बिल असल्याचा संदेश धाडला व त्यानुसार तत्काळ बिल भरा अन्यथा सेवा खंडित करण्याचा इशारा दिला.

आयडियाच्या या बिलाने त्यांना चांगलाच धक्का बसला.त्यानंतर हि खुप मोठी चुक झाल्याची लक्षात येताच त्याच दिवशी राञी आयडिया कंपनीने पुन्हा नवा संदेश धाडत तांञिक कारणामुळे संदेश गेल्याची चुक मान्य केली. परंतु आयडियाच्या या दणक्याने त्यांना चांगलाच मनस्ताप झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या