छत्रपती शाहू महाराज दूरदृष्टीचे महान राजे - परदेशी

Image may contain: 2 people, people sittingकासारी,ता.२७ जुन २०१८(प्रतिनीधी) : छत्रपती शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने सर्व समाज व वंचित घटकांचा विचार करून त्या काळी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सर्व समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न केला.महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे कार्य स्मरणात ठेवावे असे आवाहन  इतिहास अभ्यासक संतोष परदेशी यांनी केले.

कासारी (ता. शिरूर) येथील सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज मंगळवार (दि.२६ जून) रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून  इतिहास अभ्यासक संतोष  परदेशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी परदेशी यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्राचार्य अशोक सरोदे, ज्येष्ठ शिक्षिका नसीमा काझी, राजाराम साबळे,अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, विकास सानप, ज्योत्स्ना दरेकर, विजय पाचरणे, विशाल सोनवणे आदी मान्यवर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या