शिरुर तालुक्यातील १२ शिक्षकांना आदर्श पुरस्कार

Image may contain: 9 people, people smiling, people standing and indoorनिमोणे,ता.२७ जुन २०१८(प्रतिनीधी) : छञपती शाहु महराज जयंतीनिमित्त शिरुर तालुक्यातील १२ माध्यमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला.

छञपती शाहु महाराज जयंतीनिमित्त शिरुर,हवेली,पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणुन निवड करण्यात आली होती.यामध्ये शिरुर तालुक्यातील अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर गायकवाड,निमगाव म्हाळुंगीचे प्राचार्य दिलीप पवार,पांडुंरंग विद्यालय विठ्ठलवाडीचे बाळासाहेब गायकवाड,न्यु इंग्लिश स्कुल इनामगावचे बाळासाहेब जाधव,विद्याधाम शिक्रापुरचे गणेश मांढरे,न्हावरे चे दशरथ इसवे,भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागाचे संतोष शेळके,सणसवाडीतील आबासाहेब रोकडे,निमगाव म्हाळुंगीचे रमेश घावटे,ताठे विदयालय कारेगाव चे अरुण सातपुते,भैरवनाथ विद्यालय करडे येथील अनिल गावडे, थोरात विद्यालय आमदाबाद चे राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली होती.

सर्व निवड झालेल्या शिक्षकांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या प्रसंगी निमोणे येथील शिरुर तालुका शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत काळे, तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे, कार्याध्यक्ष रोहिदास काळे, शाखाध्यक्ष प्रकाश दुर्गे, आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या