शिरूरचे लाडके 'काका' आजही करतात एसटीने प्रवास

Image may contain: one or more people and outdoor
शिरूर, ता. 27 जून 2018: शिरूर तालुक्याचे माजी आमदार व सर्वांचे लाडके काका म्हणजेच सूर्यकांत पलांडे हे वयाच्या 76व्य़ा वर्षीही एसटीने प्रवास करत असून, अनेकांपुढे ते आदर्श ठेवत आहेत.

www.shirurtaluka.com ने 2017 मध्ये घेतलेल्या मतचाचणीमध्ये शिरूर तालुक्याचे 'फेव्हरेट' म्हणून माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांची निवड झाली आहे. यावरूनच काकांचे चाहते किती मोठ्या प्रमाणात आहेत, हे दिसून येते.

सध्याचे पुढारी, आमदार, खासदार व अगदी ग्रामपंचायतीचा सदस्य महागड्या गाडीमधून प्रवास करताना दिसतो. परंतु शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे हे अजूनही नेहमी दुरच्या अंतरावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एसटीने) प्रवास करणे पसंत करतात. एसटीने प्रवास आनंदी, बिनधास्त व सुखाचा होतो. या प्रवासामुळे बहुतांश एसटी वाहक (कंडक्टर) त्यांना वैयक्तिक ओळखतात. आपुलकीने बसण्यासाठी जागा देतात. एसटीतून उतरतानाही कंडक्टर रस्त्यावर उतरेपर्यंत काळजी घेतात. म्हणजेच वाहक उत्तम प्रकारची सेवा देताना दिसतात, यावरूनच काकांचे वेगळेपण दिसून येते. काकांचे चिरंजीव संजीव पलांडे हे राज्य सरकारच्या सेवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. घरची आर्थिक परिस्थीती उत्तम असून, महागड्या गाड्यांना पसंती न देता ते एसटीला जवळ करतात.

संकेतस्थळाशी बोलताना सूर्यकांत पलांडे सांगतात, 'लालदिवा, विमान, महागड्या गाड्यांपासून ते ट्रक, जीप, एसटीने आजही प्रवास करतो. एसटीच्या प्रवासामुळे सर्वसामान्यांत बसण्याची नामी संधी मिळते. प्रवाशांची ओळख झाल्यानंतर गप्पाठप्पा करायला मिळतात. शिवाय प्रवास करताना मनात कसलाच धोका राहत नाही.'

शिरूर-पुणे-मुंबई असा एसटीने प्रवास श्री पलांडे नेहमीच करतात. या प्रवासात एक आगळावेगळा आनंद मिळतो. श्री. पलांडे यांच्या एसटीतील प्रवासाचे तालुक्यातील लोक नेहमीच कौतुक करताना दिसतात. माजी आमदार असूनही काका आजही जमिनीवर आहेत. नेहमीच सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते मिसळताना दिसतात. दिवसेंदिवस त्यांच्या चाहत्यांमध्ये भर पडत असून, संपूर्ण शिरूर तालुका त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या