शिरुरला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

No automatic alt text available.शिरुर,ता.२८ जुन २०१८(प्रतिनीधी) : पुणे-नगर महामार्गालत बाहयवळणानजीक उसाच्या शेतात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आला आहे.

याबाबत डॉ.बिपिन बोरा यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,डॉ.बोरा यांची पुणे-नगर महामार्गालगत शेतजमीन असुन या शेतजमीनीत त्यांचे उसाचे पिक आहे.हि शेतजमीन करण्याकरिता सर्जेराव पैठणे हा गेल्या १५ वर्षांपासुन काम करत आहे.बुधवार(दि.२७) रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास शेतमजुर सर्जेराव पैठणे यांनी फिर्यादी डॉ.बोरा यांना फोन करुन शेतजमीनीत उसात पहिल्या सरीत एक इसम मयत अवस्थेत आढळुन आल्याचे सांगितले.

त्यानंतर फिर्यादी यांनी शेतात जाउन पाहिले असता,एक अनोळखी ५० ते ५५ वयाच्या इसमाची कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाली असुन मयताचा डावा पाय कुरतडलेला व चेहरा कुजला असल्याने ओळखु येत नसल्याचे दिसले.फिर्यादी यांनी शिरुर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यानंतर शिरुर पोलीस स्टेशनला या गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या