गजानन हॉस्पिटलच्या वतीने पोलिसांची आरोग्य तपासणी

रांजणगाव गणपती, ता. 29 जून 2018: रांजणगाव गणपती येथील श्री गजानन हॉस्पिटलच्या वतीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांची नुकतीच मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, अशी माहिती श्री रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे यांनी दिली.

मधुमेह व रक्तदाबाविषयी माहिती सांगून पोलिसांची तपासणी करण्यात आली. बहुतांश पोलिसांना कामाचा ताणतणाव व धापवळीमुळे रक्तदाब वाढत असून, चुकीच्या व अवेळी जेवणामुळे इतर पोटाचे विकार होत असल्याच डॉ. लवांडे यांनी सांगितले. यावेळी विविध आजारांविषयीची माहिती डॉ. लवांडे यांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱयांनी तपासणी करून घेतली.

दरम्यान, श्री गजानन हॉस्पिटलच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या आठवड्यातचहॉस्पिटलने आयोजित केलेल्या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली होती. या शिबिरात सुमारे २५० हुन अधिक गरजू रुग्णांनी लाभ घेतला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या