शिरुर तालुक्याची कायदा सुव्यस्था 'रामभरोसे' (वार्तापञ)

शिरूर, ता.३० जून २०१८(प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील तीन ही  पोलिस स्टेशन चे पोलिस अधिकारी बदली होऊन नवीन पोलिस अधिकारी आले असले तरी याभागात सुरू असलेले अवैध धंदे, गुंडगिरी कमी होणार का असा प्रश्न नागरिकांना सतावत असून आज तरी येथील अवैद्य धंद्यावर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.येथील कायदा सुव्यवस्था राम भरोसे म्हणावे लागेल.पोलीस खात्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांना महिती असूनही झोपेचे सोंग घेतले आसल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुक्यातील शिरूर, रांजणगाव औद्योगिक वसाहत, शिक्रापूर ही पोलीस स्टेशन असून, या तिन्ही पोलीस अधिकारी यांच्या एकाच वेळी बदली होण्याची घटना पहिल्यांदा घडले आहे.सद्या या तिन्ही पोलीस स्टेशन मधे अवैद्य धंदे मोठय़ा प्रमाणात सुरू असून यावर पोलीस खात्याचे कुठलेच वर्चस्व नाही.गावठी दारूची खुले आम विक्री, मटका, लॉटरी च्या नावाखाली सुरू असलेला मटका, तालुक्याच्या सर्वच ढाब्यांवर सुरू असलेले विना परवाना दारूचे बार, अवैद्य प्रवासी वाहतूक,असे अनेक धंदे सुरू आहेत.

त्यात या भागात आलेली औद्योगिक वसाहत यामुळे येथील तरुणाला झटक्यात नोटा येऊन पैसे वाला होण्यासाठी त्यांच्या डोक्यात भाईगिरी ची हवा गेली आहे.यामुळे या भागात अनेक तरुणांजवळ आता घोडा संस्कृती (गावठीकट्टे, अत्याधुनिक रिव्हॉल्वर)यांनी घेतली आहे.त्यात या रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडी ही सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे.त्यामुळे हें तीनही  पोलीस स्टेशन म्हणजे गुन्हेगारी चे माहेरघर होत आहे.या तिन्ही पोलीस स्टेशन चा गुन्हेगारी आलेख पाहिला व गुन्हेचे स्वरूप पाहिले तर खुलेआम गोळीबार, निर्घुण खून, खुनीहल्ले, बनावट दारू बनविणे, याप्रकारचा गुन्हेगारीचा आलेख रोज वाढत असताना यांची दखल घेऊन याभागात सक्षम अधिकारी येण्याची गरज होती परंतु पोलीस अधीक्षक यांना येथे तशी गरज वाटली नसावी किंवा राजकीय हस्तक्षेप झाला असावा असा संशय नागरिकांना आहे.शिक्रापूर येथे राजेंद्र गलांडे यांच्यानंतर संतोष गिरीगोसावी या पोलीस अधिका-याची नेमणुक केली. काही दिवसात त्यांनी वाहतूक कोंडी असेल, इतर गुन्हेगार यांच्यावर चांगला अंकुश ठेवला.परंतु त्यांची अचानक तडकाफडकी बदली करुन त्या जागी दुसरा अधिकारी नेमण्यात आला. नागरिक गिरीगोसावी यांच्या कामावर समाधानी होत असताना त्यांची बदली केली या बदली मागे त्यांनी डमी आमदार गाडीवर केलेली कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे.अशा सक्षम पोलीस अधिकारी यांच्यावर अन्याय होत असेल तर दुसरे अधिकारी काम कसे करणार ? हा मोठा प्रश्न आहे.

शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत रोडरोमियो,गल्ली गुंड यांच्यात वाढ होत आहे.रोज होणारी वाहतूक कोंडी, सुरू असलेले मटका,जुगार यामुळे येथे सक्षम अधिकारी येईल असे वाटत होते परंतु येथे नागरिकांत नाराजीचा सूर कायम आहे.रांजणगाव औद्योगिक वसाहत म्हणजे ठेके घेण्यासाठी येथे रोज दादा, भाई ची चलती आहे. त्यात येथे हॉटेलवर सुरू असलेले विनापरवाना दारूचे बार यामुळे येथे दारूचा महापूर आलेला आहे येथेही पोलीस अधिका-यांबाबत लोकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुणे नगर रस्त्यांवर असणारी ही तिन्ही पोलीस स्टेशन अत्यंत संवेदनशील असून, यामधे मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे.येथील तरूण हा रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टे यांच्या प्रेमात पडला असून, यातून खुनीहल्ले,गोळीबार, खून असे प्रकार घडले असूनही वरिष्ट पोलीस अधिकारी यांची म्हणावी अशी दखल घेत नसल्याने येथील परिस्थिती जैसे थे आहे.यात वेळीच पोलीस खात्याने दखल घेतली नाही तर तालुक्याची परिस्थिती अतिशय भयावय असणार आहे हे मात्र नक्की !

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या