निमगाव म्हाळुंगीत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात (Video)

निमगाव म्हाळुंगी, ता. 30 जून 2018: येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील 1998 च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच उत्साहात झाला.

मेळाव्यातील सर्व सवंगडी 20 वर्षांनंतर एकत्र आले होते. यामध्ये शिक्षक, सैनिक, डॉक्‍टर, वकील, उद्योजक, अभियंता, राजकीय, शेतकरी आदी क्षेत्रात आपली चमकदार कामगिरी करणारे मित्र बऱ्याच वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यांवर आगळा-वेगळा आनंद दिसत होता. दिवसभर सर्वांनी विचारांची देवाण-घेवाण केली. या वेळी शाळेतील जुन्या आठवणींना शिक्षक व विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. अनेकांनी भावनावश होऊन मनोगत व्यक्त केले.

मेळाव्यातून सायंकाळी घरी परतताना मात्र, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू भरून आले होते. सर्वजण जड कंठाने घरी परतले. या वेळी मुख्याध्यापक बाजीराव पडवळ, बाजीराव पुंडे, दिलीप पवार, किशोर गायकवाड व शिक्षक उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजन दत्तात्रेय घोलप, प्रकाश धोत्रे, गणेश शिर्के, दीपक चव्हाण, राजेंद्र म्हस्के, विक्रम चव्हाण आदींनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या