...अन् वीस वर्षांनी पुन्हा जागविल्या शाळेतील आठवणी

Image may contain: one or more people and outdoorमांडवगण फराटा,ता.१ जुलै २०१८(प्रतिनीधी) : तोच दंगा..तीच मस्ती...तोच वर्ग अन शिक्षकही तेच, सर्वजण रंगुन गेले होते जुन्या शाळेतील आठवणींमध्ये.

मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेच्या दहावीच्या इयत्तेतील(सन १९९७-९८) च्या विद्यार्थ्यांनी माजी वि्दयार्थ्यांचा व शिक्षकांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता.या निमित्त प्रत्येक जण जुन्या आठवणींमध्ये रंगुन गेला होता.प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेञात काम करत असला तरी एकमेकांची आवर्जुन विचारपुस करत होता.एकमेकांची कधीही न बोललेले या निमित्ताने भावना व्यक्त करत होते. सुमारे २० वर्षांनंतर प्रथमच दहावीचे तेच शिक्षक भेटल्याने तितकाच आनंद व्यक्त करत होता.या वेळी शाळेतील दहावीच्या वर्गातील बाकावर बसल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर जाणवत होता.२० वर्षांनंतर दहावीच्या मैञिणी पुन्हा भेटल्याने भरभरुन बोलत होत्या.या प्रसंगी शिक्षकांनी आलेल्या अडचणी व अनुभव या प्रसंगी शेअर केले.प्रारंभी प्रतिमापुजन व छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सर्व शिक्षकांचा शाल व वृक्ष देउन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी रेखा बोञे,दिक्षित मॅडम, सा.ना.काळे, देवी विजयालक्ष्मी काकडे,अशोक वेदपाठक आदींनी मनोगते व्यक्त केली.

या स्नेहमेळाव्याला माजी मुख्याध्यापक आर.आर.ठाकुर, मुख्याध्यापक नरेंद्र व्यवहारे, अशोक वेदपाठक, प्राचार्य एस.टी गद्रे, उपप्राचार्य जी.टी दळवी, सा.ना.काळे, एस.आर.काळे, आर.बी.बनकर, बी.आर.काकड़े, शशिकांत मुळे, पी.जी.मरगळ, रघुनाथ हांडे, उदमले आदी शिक्षक व वि्दयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सुञसंचालन संतोष परदेशी यांनी केले व प्रास्ताविक सचिन मचाले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश फराटे, सोमनाथ फराटे, नारायण फराटे,धनंजय हांडे, दत्ताञय बोञे, भरत कुंभार आदींनी परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या