रांजणगावला चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी (Video)

रांजणगाव गणपती, ता. १ जुलै २०१८(तेजस फडके) : येथील महागणपती मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.


पहाटे पाच वाजता महागणपतीच्या मुर्तीस अभिषेक घालण्यात आला. या नंतर मंदिर भाविंकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. देवस्थानच्या वतीने दर्शनास आलेल्या भाविंकांना विविध सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. तर रांजणगाव पोलीस स्टेशन च्या वतीने परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात अाला होता.

सलग जोडून आलेल्या सुट्यांमुळे व भाविकांनी केलेल्या गर्दीने मंदिर परीसराला याञेचे स्वरुप आले होते. जळगाव येथील पवन अग्रवाल या भाविकाने एक लाख एक हजार रुपये देणगी दिली असल्याचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नारायण पाचुंदकर यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या