सोशल मिडियामुळे सापडली हरवलेली कागदपञे

Image may contain: 3 people, people standing and outdoorनिमोणे,ता.२ जुलै २०१८(प्रतिनीधी) : तरुणाच्या तत्परतेने व सोशल मिडियामुळे हरवलेली महत्वाची कागदपञे सापडल्याची घटना घडली.

सविस्तर असे कि, निमोणे येथील रोहिदास काळे हे चाकण-शिक्रापुर रस्त्याने प्रवास करत होते.या रस्त्याने प्रवास करत असताना ते ज्या वाहनात प्रवास करत होते.त्या वाहनात त्यांची महत्वाची कागदपञे गहाळ झाली.शिक्रापुर येथे वाहनातुन उतरल्यानंतर त्यांच्या कागदपञांची बॅग विसरल्याचे लक्षात आले.ते ज्या वाहनात बसले होते त्या वाहनाचा नंबर माहित नव्हते तसे जास्त माहितीही नव्हती.परंतु सदर वाहन हे नेवासा येथे जाणार असल्याचे प्रवासादरम्यान चर्चेत समजले होते.

हाच धागा पकडत निमोणे येथील काळे यांनी नेवासा येथील एका  मिञाशी संपर्क साधला व हकिकत कथन केली.त्याचप्रमाणे कागदपञे हरवल्याची व संबंधित वाहनाचे वर्णन सदर मेसेज मध्ये करण्यात आले.हा मेसेज नगर जिल्ह्यात सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर एका टेंपो वाहनात कागदपञे असल्याचे समजले.त्यावेळी काळे यांनी नेवासा येथील शिवाजी शेणगे यांना कळविले.शेणगे यांनीही संपुर्ण शहरात सदरील वाहनाच शोध घेतला.व काळे यांना सर्व महत्वाची कागदपञे सुपुर्द केली.रोहिदास काळे यांनीही शिवाजी शेणगे व वाहनचालकाला आर्थिक मदत  बक्षिस म्हणुन दिले.सोशल मिडिया व शेणगे यांच्या तत्परतेमुळेच महत्वाची कागदपञे मिळाली असल्याच्या भावना रोहिदास काळे यांनी बोलताना व्यक्त केल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या