डॉक्टर डे निमित्त 'स्पंदन' कडून डॉक्टरांचा गौरव

Image may contain: 8 people, people smiling, people standing and suit
शिक्रापुर, ता.३ जुलै २०१८ (प्रतिनीधी) : शिक्रापुर येथील स्पंदन वैद्यकिय सामाजिक संस्थेच्या वतीने परिसरातील डॉक्टरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शिक्रापूर येथे डॉक्टर डे निमित्त सोमवार (दि.२ जुलै) रोजी ऋतुगंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  वैद्यकिय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कोरेगांव भीमा येथील डॉ. प्रकाश शिंदे यांना स्पंदन भूषण पुरस्कार तर प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार शिक्रापुर येथील बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र भुजबळ यांना पुण्यातील प्रसिद्ध नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. प्रदीप सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात शालान्त परीक्षेत उज्वल यश मिळवीणाऱ्या डॉक्टर पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी करमणुकी चा ऋतुगंध हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब इंगळे ,माजी अध्यक्ष डॉ. श्रीकांत साकोरे, डॉ. मच्छीन्द्र गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. योगेश झुरुंगे, सचिव डॉ. रामदास देवखिले, खजिनदार डॉ. विनायक कावरे, डॉ. चंद्रकांत केदारी, डॉ.रवि टेमगिरे,  डॉ.  हेमंत दातखिळे, केअर हॉस्पिटल वाघोली येथील डॉ. भूषण विधाते यांचे सह परिसरातील सुमारे १५० डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल व्यवहारे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या